Wednesday 22 February 2017

मालाड पूर्व कुरार मध्ये बोगस मतदान ...तुमचा काय stand आहे याच्यासाठी ....?

मालाड पूर्व कुरार मध्ये बोगस मतदान ...
मतदान करणे हा प्रत्येक भारतीयाचा संविधानिक अधिकार आहे .....आतापर्यंत शासन सांगत .....मतदान करायला जा ...त्यांच्या वेगवेगळ्या जाहिराती आपल्याला जागो जागी दिसतात ...मालाड पूर्व ...वार्ड क्रमांक ४३  ...ला यावेळी जबदस्त वेगवेगळ्या घडामोडी झाल्या ...एकतर मेलेल्या माणसांची नावे वोटिंग लिस्ट मध्ये दिसण्यात आली ...दुसरी कडे वर्षानुवर्षे मतदान करत आहेत त्यांची  नावे लिस्ट मधून गायब झाली .....एका एका व्यक्तीची नावे ३ ते ४ पूल भूत वर दिसली ....चौथी आणि महत्वाची घटना अशी झाली एक व्यक्ती च्या नावावर 


अगोदर जाऊन दुसरा कोणीतरी मतदान केलय ...हि बाब ज्यावेळी मलाड पूर्व कुरार मध्ये राहणाऱ्या रोहिणी दळवी यांना मतदान करायला गेल्यावर समजली ....  नावावर मतदान अगोदरच झालय ....पण , ते मतदान त्यांनी केलं नव्हत हि ,  त्यावेळी त्यांनी संबंधीत अधिकारी यांना विचारलं ... त्ते सारवा सार्वीची उत्तरे देऊ लागली ...त्यांनी आणि त्यांच्या मुलाने मग , व्यवस्थेवर प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळी भरपूर सारे पोलीस त्याठिकाणी जमा झाले ....एका बाजूला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेलेल्या नागरिकाच्या नावाने अनोळखी व्यक्ती जर मतदान करतोय ....तर , मग एवढी मोठी यंत्रणा कामाला लाऊन त्याचा काहीच उपयोग नाही ....कारण , या ठिकाणी माझ्या हक्काच  " मत " मला द्यायला मिळत नाही हि सर्वात मोठी खंत ...कारण , एक सामान्य नागरिक ज्यावेळी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो ..त्यावेळी सिस्टम त्याला लवकर सहकार्य करत नाही ...थोड्या वेळानंतर याच्यावर मार्ग काढण्यात आला ...आणि त्या ठिकाणी उपस्थित अधिकारी यांच्याकडून लिहून घेण्यात आलं ...या ठिकाणी ...वेगळ्या व्यक्ती ने येऊन मतदान केलं आहे ...त्याच्या नंतर कगदोपत्री माहिती लिहून घेण्यात आली .. नंतर त्यांना जुन्या पद्धतीने मतदान कारायला देण्यात आलं ..दरम्यान आपलीच पोळी भाजून घेण्यासाठी येणाऱ्या पक्षातील मंडळी , आणि नेते आम्ही तुमचं काम करतो ...फक्त मत आमच्या पक्षाला येऊ द्या ...अशी नजरेने आणि कुसूर ...कुसूर बोलणारी मंडळी हि त्या ठिकाणी होती ...हो आणि मालाड पूर्व मध्ये रोहिणी दळवी यानी एक पाउल उचलले या व्यवस्थेला प्रश्न विचारून आपला अधिकार मिळवण्यासाठी ...आपणही सक्षम आहोत ....असं भारताचा नागरिक बोलायला काहीच वावग नाही .....

सदर मतदान प्रक्रियेत पुढील दस्ताऐवजांचा वापर करण्यात आला. (फक्त अधिक माहितीसाठी)
 





एक भारतीय नागरिक -
तुषार म्हस्के  

Tuesday 21 February 2017

मालाड पूर्व च्या मतदान केंद्रात भोंगळा कारभार???

मालाड पूर्व च्या मतदान केंद्रात भोंगळा कारभार???

काल दि. २१ फेब्रुवारी रोजी मालाड पूर्व च्या कुरारगावातील संस्कार शाळा ४३/३ ह्या मतदान केंद्रात बोगस मतदान झाले. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेलेल्या श्रीमती रोहिणी दळवी यांना सांगण्यात आले कि.. तुम्ही मतदान करु शकत नाही, कारण तुमच्या नावाने काहीवेळापुर्वी मतदान झालेले आहे. मतदान केंद्राध्यक्ष ना हि झाली बाब निदर्शनास आणून दिली. "अशा लहान सहान गोष्टी मतदानाच्यावेळी होतच असतात" असे त्यांनी सांगितले. मतदान प्रक्रियेत झालेल्या ह्या अन्यायावर न्याय मिळविण्यासाठी बोगस मतदान झाल्याची बाब तेथील पोलिंग एजंट, पोलिस यंत्रणा, एआरओ, पी आर ओ ह्यांच्या पर्यंत कळविण्यात आली परंतु ह्या बोगस मतदान बद्दल अधिक चौकशी न करता त्यांनी पर्यायी मतदान करण्याची प्रक्रिया सांगितली. अखेर प्रदत्त मतदान पद्धतीने मतदान करण्यास सांगितले. जुन्या मतदान प्रक्रियेप्रमाणे पोस्टल बॅलेट पेपर वर मतदान करण्यास सांगितले व प्रदत्त मतदान यादी वर नाव व सही करून घेतली. परंतु ह्या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांनी मतदार कर्त्याच्या बोटांना निळी शाई मात्र लावली नाही. तसेच तत्सम कागदावर निवडणुक केंद्राचा स्टॅंप मारला नाही. सदर झालेल्या बोगस मतदानाच्यावेळी तेथील एआरओ कडुन लेखी अहवाल मागविण्यात आला. ह्या संपुर्ण बाबी पुर्ण करण्यासाठी निवडणुक अधिका-यांनी मतदानकर्त्याचे 4 ते 5 तास खर्ची घातले. परंतु लेखी देताना सदर मतदान केंद्रात बोगस मतदान झाले हा शब्द प्रयोग त्यांनी कटाक्षाने टाळला. (नोकरी वाचविण्यासाठी असेल कदाचित)

# अशा प्रकारचे बोगस मतदान प्रत्येक केंद्रावर झाले नसणार हे कशावरुन???
# मृत पावलेल्यांची पुष्कळ नावे मतदार यादी मध्ये समाविष्ट असल्याने त्यांच्या नावे बोगस मतदान झाले नसणार हे कशावरुन???
# प्रदत्त मतदार यादीतुन झालेल्या मतदान हे व्होटींग मशीनवर झालेल्या बोगस मतदानातुन वजावट केले की नाही याची जबाबदारी नेमकी कोणाची? जर तसेच झाले नाहीतर बोगस मतदान करणाऱ्यांचा १०० टक्के विजय असेल. आणि मतदान यंत्रणेचा पराजय.
# मतदान केंद्रात सीसीटिव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे बोगस मतदान करणाऱ्यांसाठी मोठी मुभाच म्हणावी लागेल?
# हाती आलेल्या बातमी नुसार..." मुंबई : मतदार याद्यांमधून तब्बल 11 लाख मतदारांची नावं गायब" म्हणजे हा कोणता बेजबाबदार कारभार म्हणावा लागेल?
# मतदान केंद्रात बसलेल्या बसलेल्या ४ हुन अधिक पोलिंग एजंट कडे भिन्न भिन्न मतदार याद्या असल्याचे दिसुन आले. त्यापैकी काही एजंट ने असे सांगितले की काल रात्री काही मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्याचे सांगितले.
# निवडणुक आयोगाच्या वेबसाईट वरील यादी आणि बॅलेट ऑफिसर कडे उपलब्ध असलेली यादी ह्यात खुप तफावत असल्याचे दिसुन आले.
(इतिवृत्त)

सदर मतदान प्रक्रियेत पुढील दस्ताऐवजांचा वापर करण्यात आला. (फक्त अधिक माहितीसाठी)




Monday 20 February 2017

असा वेगळा - अनुभव सकारात्मक विचार निर्माण करणारा.....

विध्यार्थी वयात सर्वात आणीबाणीचा कालावधी म्हणजे इयत्ता दहावीचं वर्ष ... या वर्षामध्ये असे असे सल्ले येतात कि काय खायचं ? ....काय नाही खायचं ?...बाहेर पडायचं नाही ....टाइमपास करायाचा नाही ....शाळेतील शिक्षक चांगले गुण मिळवण्यासाठी अपेक्षा ठेवतात ...दुसऱ्या बाजूला कोचिंग क्लास वाले चांगले मार्क्स मिळून पास होतील याच्यासाठी अपेक्षा ठेवतात ...घरातले सर्व मित्र मंडळी पहिला नंबर काढेल याची वाट पाहत असतात ....असं हे अपेक्षांचं ओझ या वर्गावर झालेला असतं ...मग,



कोणीतरी अशा या प्रेशर कुकर चा दबावाखाली असणारी अवस्था आणि त्यातच अपेक्षांचं ओझ ...श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही ...ज्या ठिकाणी आपल्या आयुष्याची सुरुवात होत असते त्या ठिकाणी दडपण निर्माण झालेलं असतो ...माझा पहिला नंबर येणार कि नाही ? ..... दुसऱ्या बाजूला माझ्या सारखे असतात मी पास होणार कि नाही ...काही असतात मला ७० % पेक्षा जास्त मिळणार कि नाहीत .....अशी हि आणीबाणी ची अवस्था .... या अवस्थे मध्ये विचारांचा मोकळा श्वास विदर्भ विद्या मंदीर शाळा , मालाड पूर्व येथे TOR ( Theatre of Relevance) ने ....१० वीच्या विद्यार्थ्यांना १० वी ला पाहण्याची नवीन वैचारिक दृष्टी दिली त्याचं बरोबर मला आता काय करायचं आहे ? त्याचं नियोजन जे जीवनामध्ये नवीन स्वप्न ,ध्येय आणि विचार घडवण्यासाठी सकारात्मकता निर्माण करेल .....



१० वीचे विध्यार्थी hall मध्ये बसले त्यावेळी एकदम शांत वाटले ... आणि त्या hall मध्ये येण्या अगोदर होणारी त्यांची चलबिचलअवस्था ... आता आल्यानंतर शांत होती .....काहीच बोलायला तयार नव्हती ....बसण्याची पद्धत एकदम ....आपली भीड , गर्दी , आणि त्यामध्ये हरवून गेलेली ....शांततेने या कार्यशाळेची सुरुवात झाली ....एकमेकांना दिसतोय का ? मग सर्कल बनला गेला ...त्यानंतर समाजाची एक व्यवस्था आहे मुली एका बाजूला आणि मुले एका बाजूला ....१० वर्षाच्या शिक्षण यंत्रनेत प्रश्न पडतो ...समानता स्त्री -पुरुष समान हे तत्व आपली शिक्षण व्यवस्था त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवू शकली नाही ....कि , बाबा तू मुलगी आणि मुलगा


यांच्या पहिले तू माणूस आहेस आणि माणुसकी हिच सर्वात मोठी आहे ....या कार्यशाळेत ...१० वी बरोबर हि प्रक्रिया झाली आणि सर्व जन एक मेकांच्या बाजूला जाऊन बसले ... समानता त्या ठिकाणी दिसायला लागली ....आणि या प्रक्रियेमध्ये सर्कल मध्ये बसल्यानंतर शाळेच्या ट्रस्टी या हि खाली येऊन बसल्या ...नंतर शाळेतील शिक्षिका या हि येऊन बसल्या .... आणि तोच सर्वात मोठा आदर्श आहे आता शिक्षक हि शिकण्याच्या भूमिकेत आलेले आहेत ... त्यांना हि त्यांच्या मध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना शोधून काढायचं आहे .....या मुलांना प्रश्न विचारलं ...तुम्ही इथे कां आले आहात सांगा ... सुरवातीला कोणीच उत्तर द्यायला तयार नव्हता ..थोड्या वेळाने उत्तरे यायला लागली ...आणि उत्तर आल्याशिवाय गाडी पुढे जाणारी नव्हती ...मग, कोणी सांगितला व्याख्यान आहे ...कोणी सांगितला सरांनी सांगितलं आहे ....कोणी सांगितलं जीवनात जगण्याचे नवीन मार्ग तुम्ही सांगणार आहात ....अशी वेग - वेगळी उत्तरे येत होती ....त्यातच त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते ...कि, आता काय बोलू ...? एवढा कधीही विचार केला नाही अशी अवस्था ....मग, सर्वाना उभं केलं आणि धावत जाऊन, स्टेज वर जाऊन यायला सांगितले ...सर्व जण जाऊन आले ...आणि त्यातच त्यांच शरीर हे फ्री होताना दिसू लागले .....जमिनीवर आल्यानंतर ...तुमच्या साठी १० वी काय आहे ? आवाहन मग , ते आवाहन


घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का ? मग, डोळे बंद करून प्रक्रिया घेण्यात आली ...जी संपूर्ण शाळेतील परिसरात फक्त कान आणि आपल्या जाणीवेने फिरायचं त्यात डोळे उघडायचे नाहीत .....संपूर्ण परिसरात फिरत असताना माझी जबाबदारी होती ज्या ठिकाणी पडून लागण्याची भीती आहे


... त्याठिकाणी जाऊन उभं राहनं आणि कोण कुठे जातोय ते पाहनं....हे सर्व घडत असताना प्रत्येक जन त्यांच्या त्यांच्या कोशामध्ये अडकलेला दिसला ....या प्रक्रिए नंतर सर्व जन येऊन डोळे बंद असताना एकमेकांचा हात पकडला .... आणि डोळे उघडले ... त्यावेळी जाणवल कि , ती 


उगवलेली विचारांची स्पष्टता त्यांच्या डोळ्यातून दिसू लागली .... आपल्या अंधाऱ्या कोशातून बाहेर काढण्यासाठी स्वतः बरोबर भांडून ....स्वतः वर विजय मिळवून पुन्हा या अंधारातून बाहेर पडल्याचं समाधान 
...त्याने त्यांची बदललेली विचार क्षमता सर्वजन मोठ मोठे तत्व मंडळी वाटू लागली ...विचार स्पष्ट सरळ ...एकदम थेट ....स्वतः वर विश्वास असतो त्यावेळी अंधारातूनही मार्ग दिसतो .... डोळे , नसतानाही अंधारात चालता येतं ....स्वतः चा शोध घेतला ...या अशा उत्तरांना ऐकल्यानंतर वाटले या प्रक्रीये अगोदर यांची अवस्था हि वेगळी होती आता उन्मुक्तता दिसू लागली ....या प्रक्रीये नंतर सर्वाना अलाप करत पळायला लावले ...एक झुंड हि होत होती ...त्यामध्ये पुन्हा ..त्यांना विचार स्पष्ट केल्यावर सर्वजण वेग -वेगळ्या दिशांना पळायला लागले ... शरीरातील ताण , 


तणाव आपोआप निघून गेला आणि सर्वजण एकमेकांनबरोबर सहजतेने वागू लागले ....या बरोबर Smileyee (Ashwini Nandedkar ) ने प्रश्न विचारला आम्ही इथे आल्या पासून काय -काय केलं त्यातून तुम्हाला काय मिळाले ? .....मग , त्यातून येणारी उत्तरे हि , जबरदस्त होती .....अभ्यास करताना मिळून मिसळून करायचा , संगीत अभ्यास , स्वतः ला काय येते


 ते पहायचं ,शांत वातावरण निर्माण करायचं , फोकस वाढवायचा ,नियोजन करायचं प्रश्न solve करायचे , concentration , जिगण्यासा , संवाद , लवकर उठायचे , मोजकाच पण मन लावून अभ्यास करायचा , presentation ....



थियेटर ऑफ रेलेवंस ची प्रक्रिया सर्व व्यापी आही ...जी नवीन दृष्टी आणि प्रयोगात्मक विचारांची निर्मिती करते .....


असा वेगळा - अनुभव सकारात्मक विचार निर्माण करणारा विदर्भ विद्या मंदीर शाळेमध्ये , थियेटर ऑफ रेलेवंस च्या प्रक्रियेमधून आला .....

रंगकर्मी - तुषार म्हस्के

Sunday 19 February 2017

आजचा दिवस हा सकारात्मकतेला आकर्षित करणारा वाटला ..

क्षणा क्षणाला बदलत जाणारं वातावरण आणि त्याची निर्मिती करणारी. TOR ( Theatre of Relevance) ची प्रक्रिया ....विचारांची व्यापकता वाढवून ते विचार तळापर्यंत पोहचवत असताना दिसलेे ....कुरार व्हिलेज ,मालाड पूर्व , विदर्भ विद्या मंदिर शाळेत हि प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देऊन सकारत्मक विचार आणि दृष्टिकोन वाढवत असताना दिसू लागले ....


इयत्ता नववी चे विदयार्थी हि बॅच आतापर्यंत शाळेतील शिक्षक त्यांना आतंकवादी बॅच बोलायचे , वर्गाला शांत करण्यासाठी कोणीतरी एक बकरा पकडायचा मग, त्यानंतर सम्पूर्ण वर्ग शांत राहायचा ...परंतु , याठिकाणी TOR ( Theatre of Relevance) ची प्रक्रिया कार्य करते , जोपर्यंत मनाची तयारी होत नाही तो पर्यंत जबरदस्ती करायला नाही लावत ... 


सहभागी असलेल्या साथींनकडून जोपर्यंत येत नाही मला माझ्यावर काम करायचं आहे ....तोपर्यंत , एकतरफ़ी प्रेमासारखं काम नाही करत , ती दोन्ही बाजूने अभिव्यक्त होणारी प्रक्रिया आहे ....नववी च्या दुसऱ्या दिवशी च्या सत्रात आल्यानंतर हि मुले जबदस्त आनंदी दिसली ....लेटर सर्वांनी लिहून आणले होते ....आता पर्यंत वर्क शॉप मध्ये एक तरी बिना लेटर चा यायचा पहिल्यांदा मी पाहिलं ...सर्व विद्यार्थ्यांनी लेटर लिहून आणले होते ...आणि त्यामध्ये असणारी वैचारिक स्पष्टता हि मनाला भावणारी होती ....त्यानंतर रिदम घेण्याची प्रक्रिया झाली या प्रक्रियेमध्ये सर्कल मध्ये जाऊन बसण हे सर्वात मोठ अवघड काम ...सर्व प्राण्यांसारखे कळपा मध्ये यायचे एकमेकांच्या अंगावर पाय देऊन बसायचे ...


हि एक माणसाची मनोवृत्ती आहे आपल्याला विचार नाही मिळाला ...कां करतोय ते नाही समजल कि लगेच प्राण्यांसारख होऊन जायचं ....या परिस्थिती ला निपटण्यासाठी ....त्यांना challenge देण्यात आलं ... बघुयात तुमच्या मध्ये आहे दम तर व्यवस्थित बसून दाखवा ....आणि हा एक स्वभाव आहे ज्यावेळी व्यक्ती आपले आवाहन स्वीकारतो आणि त्या परिस्थितीला सामोरे जातो ... त्याचं पद्धतीने या विद्यार्थ्याना आवाहन केल्यानंतर त्यांनी आवाज न करता जागेवरून उठले आणि सर्कल मध्ये जाऊन बसले ... आजचा दिवस हा सकारात्मकतेला आकर्षित करणारा वाटला ....


.या बालिका आणि बालक मध्ये जबरदस्त ऊर्जा दिसू लागली होती ..... आणि त्या रिदम मध्ये ते वातावरण अगदी चैतन्यमय होऊन गेले .....त्याच्यामध्ये सामुहीकता , वैचारिकता आणि एक सूर हे एकत्र दिसताना जाणवू लागले व त्याचं बरोबर त्यांना दिशा हि दिली जात होती .....नंतर त्यांना प्रश्न देण्यात आले " मी जिवंत का आहे ? ' मी माझे ध्येय कशा पद्धतीने पार करणार ? '' त्यासाठी माझी नैतिक जबाबदारी काय आहे ? ... या प्रश्नांची उत्तरे लिहित असताना ....एकदम शांतता सर्व ठिकाणी पसरलेली दिसली ... शाळेतील शिक्षक अगदी ...बाजूला बसून बोलत होते ....हि शैतान मंडळी एवढी शांत बसली आहे आणि यांना कोणच काहीही बोलत नाही आहे .....कोणाला दम द्यायची गरज नाही कोणाला मारायची गरज नाही ....हि मुलं शांत बसली आहेत म्हणजे पृथ्वीवर जीव आल्यासारखे जाणवत आहे १५ ते २० मिनिटे शांततेत लिहिल्यानंतर त्यांनी लिहिलेले अनुभव वाचायला सांगितले ...


अनुभव वाचत असताना प्रत्येकाचा शब्द उच्चार त्याची बोलण्याची पद्धत हेच सर्वात मोठ साध्य असल्याचे जाणवू लागले ....विचारांचे परिवर्तन हे क्षणात बदलत असताना जाणवू लागले ....काल जे आतंकवादी हातात दिले होते ते आज एकदम साधू झालेले दिसले ....या प्रक्रीये मध्ये शिशक हे या विद्यार्थ्यांकडे कुतुहलाने पाहत होते .....त्यानंतर प्रत्येकाचा रोल मोडल आणि त्यांचा एक गुण यांवर चर्चा करायला सांगितले आणि हे ग्रुप मध्ये चर्चा करायला सांगितले ....ती चर्चा एकदम मन लाऊन केली जात होती ...एकत्रितपणे सर्वांचा सहभाग हि त्या मध्ये दिसू लागला ...प्रत्येक जन त्या विषयाला अगदी सखोल चर्चा करून मांडताना दिसू लागला ....


त्या मिळालेल्या उत्तरांना आता प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार बनवायचा त्यासाठी नाटकाची प्रक्रिया आणि या प्रक्रियेमध्ये त्यांच्या समोर असणारी आवाहाने आणि त्याचं बरोबर त्यांच्यावर मात कशी करणार ......या विषयाच नाटक करण्यासाठी वेळ फक्त १५ मिनिटे या वेळेत ते नाटक करू शकतात .. तो आत्मविश्वास निर्माण करण ...त्यांच्या स्वपनांमध्ये 


अडथळा येणाऱ्या घटना मधून कशा पद्धतीने बाहेर पडतील यांवर मनन आणि चिंतन सुरु झाले ...मग या प्रवाहात उडी मारली आणि मी जेवढा त्यामध्ये स्वतःला झोकून देतोय त्या पद्धतीने सहभागीचा येणारा response हा अवर्णनीय दिसला तेवढंच कुतूहल .....तेवढाच विश्वास , तेवढीच उर्जा आणि त्या उर्जेला असणारी दिशा .... कमजोर कडीला पकडून तिला सक्षम केला ... आणि त्याच प्रक्रियेमुळे ग्रुप एकदम ताकतवर झाला ... आणि सादरीकरण जबरदस्त झालं ...


 त्यामध्ये आपली मैत्री कशी असावी ...ग्रुप च सहकार्य आणि चांगली मैत्री ...माझा निर्णय आणि माझं ध्येय त्यासाठी माझी पाउले ... या गोष्टी दिसण्यात आल्या .... ३ गटांचा सादरीकरण अशा पद्धतीने झाले कि , एकदम जबरदस्त मोठे कलाकार आहेत ...



आणि तोच आत्मविश्वास TOR ( Theatre of Relevance) ने मनात निर्माण केला ...हो हे जग माझं आहे ....आणि माझी स्वप्ने मी पूर्ण करू शकतो .......




रंगकर्मी 
तुषार म्हस्के

वादळाच्या अगोदर असणारी शांतता कधी कोणी पाहिली आहे का ? .

वादळाच्या अगोदर असणारी शांतता कधी कोणी पाहिली आहे का ? ....असा प्रश्न विचारला तर त्यात काहीच वावग नाही आहे ...मनात सतत निर्माण होत असणारी उष्णता, आज सर्वोच्च पातळीला जाऊन फक्त फुटण्याच्या मनस्थितित दिसू लागली...माझ्या जीवनात मला विचारले जाणारे प्रश्न तुला हे नाटकच करायचं होत तर शिकायची काय गरज होती ? आणि या मुलांचे वर्कशॉप घेत असताना जीवन जगायला शिकवतो ....आणि त्यात जीवनात आलेला ,येत असणारा अनुभव म्हणजे आपला अभ्यास .... 


पाठ्य पुस्तकाबरोबर जीवनाच्या पुस्तकात लिहायला आणि वाचायला शिकवतो .....अशीच ही शांतता विदर्भ विद्या मंदिर शा ळेमध्ये पसरली होती ....माझ 7 वी ते 10 वी च शिक्षण याचं शाळेत झालं त्यामुळे जीवन जगत असताना आलेले अनुभव आता ....त्या अनुभवाना सकारात्मक 



दृष्टि देऊन .... आत्म विचार रूपाने अनुभव देत होतो....आजच्या दिवसामध्ये इयत्ता 9 वी ची बैच होती ....सुरुवातीला गड़बड़ करणारे विद्यार्थी आम्ही आज काहीही न बोलता समोर जाऊन उभा राहीलो आणि आम्ही 4 रंगकर्मी नवीन रंग या किशोर अवस्थे मधील बालक आणि बालिका मध्ये पाहत होतो ....10 ते 15 मिनिटे शांत सर्व जन आम्ही 



कोणालाच काहीही बोलत नव्हतो थोड्या वेळाने सर्व जन शांत झाले ....एकदम कोलाहातील शांतता सर्वत्र पसरली होती ....फक्त नजरेने जग बदलता येत हेच डोळ्यात दिसत होते....कुठे ते शांत बस ....शांत बस ...सांगून न एकणारे विद्यार्थी आणि कुठे ते फक्त नजरेच्या खुनेने शांत बसणारे ....या शांततेनंतर या उर्जेचा रूपान्तर आता collective उर्जे मध्ये झालेले दिसलं ...




.आम्ही येण्याअगोदर कोणताही वाद्या चा उपयोग न करता छान अशा रिदम ची निर्मिती केली होती ....मग, त्या उर्जेला दिशा देण्यासाठी सर्वानी एका तालात एका सुरामध्ये रिदम वाजवायला सुरुवात केली ....आणि हे वादळ जे नवीन दृष्टी, कल्पकतेच्या पुढे घेऊन जाणारं दिसलं ...



.एका सुरात आणि एका तालात सर्व जण वाजवू लागले याच बरोबर सर्वांच्या मनात वेग - वेगळे प्रश्न निर्माण झालेले दिसले .....मैत्री म्हणजे कशी असावी यावर नाटक करायला वेळ दिला ....त्याच बरोबर काही गटांनी समाजातील विषमता असं, त्यांनीच विषयाची निवड केली ....आत मध्ये खूप ऊर्जा पण, ज्यावेळी ती वयक्तिक उर्जे मध्ये परावर्तित होत असते त्या वेळी ती दबलेली असते ...



.भीड मध्ये कोणीही येऊन टपली मारून जावं ...पण, समोर उभा राहून बोलणारे कमी मग, त्यांना दिशा देत त्यातून व्यक्ती ला बोलतं केला ...आवाजाचा चढ उतार , त्याच बरोबर आलाप , हमींग करत पळनं....वेगवेगळ्या आकृती मधून शाळा, गाव , शहर, पक्षी झाडे जंगल अशी वेगवेगळी रूपे आकार घेऊन त्वरित imagination मध्ये भर पड़त असताना दिसू लागले .....काहिंचे चेहरे चमकू लागले , काहिजन acitve झाले , काहिजन प्रश्नांची उत्तरे देऊ लागले ...असे हे क्षणा क्षणाला बदल होताना दिसू लागले ....याच उर्जेमध्ये स्वतः ला या उन्हामध्ये तापवून तप करणारे हे स्वतः च्या शोधात धावणारे विद्यार्थी अगदी विशाल 

जीवनाच्या समुद्रात सत्व शोधताना दिसू लागले....जीवनात कधीही नाटक केलं नाही ...असे स्टेज होल्ड करून ठेवायला शिकले ....ही माझ्या विश्वातिल जागा आहे याची जाणीव त्यांना झाली आवाजामध्ये बदल दिसून आला ... नाटकाचं सादरीकरन म्हणजे ,त्यांनी स्वतः च्या विचारांचा केलेला अभिव्यकपणा 
शांतते नंतर ऊर्जेला दिशा ,प्रश्न त्याच बरोबर अभिव्यक्त होणं हे ToR च्या प्रक्रियेतून समोर येत असताना दिसू लागले.

रंगकर्मी
तुषार म्हस्के

Friday 17 February 2017

प्रेरणात्मक विचार आज पाहायला मिळाले ....

एक शब्द आहे समानता ...मी मुलगा आणि मी मुलगी ....याच्यापलीकडे एकमेकांना पाहणे ....विदर्भ विद्या मंदीर मध्ये होत असणारी कार्यशाळा अगदी विद्यार्थांमध्ये क्षणा क्षणाला बदल घडवून आणत आहे हे जाणवू लागले ...कारण , आपल्या शिक्षण व्यवस्थेत मुले एका बाजूला आणि मुली एका बाजूला अशा रांगामध्ये बसणारे विद्यार्थी ....त्यातच , एकादा मुलींच्या बाजूला बसला तर त्याला चिडवून हैराण करणारी मानसिकता 



...मग , कधी कोणाबरोबर बोलनं नाही ...याच्यातून लांब जाऊन गर्दी मध्ये एकमेकांना ढकलून पुढे ...पुढे ढकलत असताना दिसू लागली ....या दोन दिवसाच्या प्रक्रियेमध्ये हि , मानसिकता कमी होत असताना जाणवू लागली १५ फेब्रुवारी च्या अनुभवामध्ये विद्यार्थ्यांनी लिहिले होते आम्ही ...मुलगा आणि मुलगी हे समान आहेत .पहिल्यांदा एकत्र असल्यासारखे वाटले ....या कार्यशाळेची व्यापकता अगदी स्पष्ट ....



त्या बालक , बालिका आणि शाळेतील शिक्षक वर्ग यांना प्रेरणा देताना दिसू लागले .....छडी ची मानसिकता असणारे विद्यार्थी ...आता माणुसकीच्या वागण्यात परिवर्तन होत असताना दिसू लागले ...एका बाजूला बाहेर ऊण तापवत आहे दुसऱ्या बाजूला .....डोक्यात सुरु असणारे विचार तापवत होते ....जीवन जगणे हि एक कला आहे आणि आपला अधिकार आणि हक्क यामध्ये असणारी माझी भूमिका काय हे स्पष्ट 



नसल्यामुळे ....फक्त एकमेकांचा पाय खेचणारी हि मानसिकता , जेव्हा त्याच कडी ला समोर आणते स्वतः बरोबर झगडून नवीन विचार आणि आयाम ...त्याच बरोबर माझी भूमिका आता निर्णय घेण्याची आहे याची जाणीव झाल्यानंतर त्या मनस्थिती च झालेलं सकारात्मक ऊर्जेमध्ये 



परिवर्तन डोळ्यांना दिसू लागले ....या बालक आणि बालकांना tor ने स्वप्न दिलं ...drop by drop ...नावाचं नाटक केलं ...आणि ते युरोपात जाऊन सादर केलं ...असं तुम्हाला वाटत का कि तुम्ही हि स्वप्न पाहू शकता ....यावर आलेली उत्तरे हि , नाही ...मग, यावर प्रक्रिया करून त्यांना स्वप्न दिलं विचार दिला ......माझी आताची शाळा आणि स्वप्नातील 



शाळा ....आणि हे शाळेच रूप ज्यावेळी आपल्या नाटका मध्ये दाखवलं गेलं ...त्यावेळी चमकत असणारी विचारांची दृष्टी ...नवीन आकृती ...झाडे ,पक्षी ,खेळणारी बालक - बालिका , सुंदर असं मैदान ...काय कल्पना आहे ती .....हेच , आहे स्वप्न निर्माण करण ...जे या बालकांना अगदी त्यांना जगत असताना ध्येय निर्माण करून देणार ....तोड मर्दा तोड हि चाकोरी ....तोड बाई तोड हि चाकोरी ....मुक्तीच गीत गाऊ रात आहे अंधारी ....हे गाण्यातील स्वर ...एक चौकट ....



जी मनामध्ये बनलेली आहे ती तोडून स्वतः च्या अस्तित्वाची आहे ......कमजोर कडी ला पकडून त्याच्या बरोबर प्रक्रिया करण.हि जागा माझी आहे .....हे जीवन माझ आहे .... त्यामध्ये , हे जीवन जगण्याच सूत्र आहे ते म्हणजे विचार ...आणि हा सृजनात्मक विचार या ठिकाणी निर्माण होत असताना दिसू लागले ....४ गटांमध्ये केलेला विभाजन म्हणजे 




वयक्तिगत लक्ष देऊन ....बदलाची प्रक्रिया विचारांमध्ये निर्माण करणे ...... आता , हे विद्यार्थी २ ते ३ तासांमध्ये बोलायला लागले ...आपला जगण्याचा अधिकार मागायला लागले ....ज्यांचा आवाज खूप छोटा आहे त्यांचा आता मोठ्याने येऊ लागला बोलताना शब्द हे वाढू लागले ...शब्दांचा होत असणारा सुंदर उपयोग ....विचारांना फुलवताना दिसू लागाली 



....स्वतःमध्ये झालेलं परिवर्तन ...नाटक रूपाने सादरीकरण करणे व जीवन जगण्याची सूत्र या भीड वाल्या मानसिकते मध्ये निर्माण करण ...त्यातही आता मी एक लीडर आहे ते initiative घेण हे बदल दिसू लागले ....नाटक सादरीकरण होत असताना शिक्षकांना प्रेरणा देत ....त्यांना हि बोलायला लावलेली प्रतीकात्मक आणि प्रेरणात्मक विचार आज पाहायला मिळाले ....



हि यात्रा नवीन - स्वप्नांना जागवते , स्त्री - पुरुषाच्या मानसिकतेतून बाहेर काढते , निर्णय घ्यायला भाग पाडते .....



रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Wednesday 15 February 2017

ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे विद्यार्थी ...

ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे विद्यार्थी ....हे विध्यार्थी म्हणजे आपल्या राष्ट्राचे भविष्य हिच सुरवात आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्स च्या रंगकर्मीनी केली ...आम्ही एक पुढाकार घेऊन कुरार व्हिलेज , मालाड पूर्व, मुंबई येथील ... विदर्भ विद्या मंदिर विद्यालयात केली...काय आग आहे त्या मुलांमध्ये 




....थोडा वेळ शांत न बसणारे, एकमेकांत मस्ती करणारे , प्लास्टिकने विणलेल्या झोपडीत राहणारे 80% विद्यार्थी ....हे विद्यार्थी म्हणजे आगीचे गोळे... घरामध्ये आई आणि वडील हे दोघे कामाला जाणारे आणि त्यातच यातील बहुतांश मुले हे वाईट संगतीत असणारी..... आजूबाजूच्या वातावरणाचा होत असणारा प्रभाव ...कधीही पुढाकार घ्यायची तयारी नसणारी मानसिकता ...3 तासांमध्ये बोलायला लागली ...प्रश्न विचारल्या नंतर तू पुढे ....तू पुढे ..एकमेकांना टपली मारून ...सारवा सारव करणारी मानसिकता कमी झाली....सुरवातीपासून ते शेवट पर्यंत ऊर्जेचा फ्लो वाढत असताना दिसू लागला..संघर्षामधून जीवन घडत असते आणि



आम्ही कलाकार संघर्ष करून या मुलांमध्ये निर्माण होत असणाऱ्या प्रकाशाच्या झोताला दिशा देण्याचे काम करू लागलो... ....101 विध्यार्थी ...विदर्भ विद्या मंदिर शाळेचं पटांगण ...हॉल... ...सर्वत्र वातावरण अगदी जीवन्त झाल्यासारखे दिसू लागले ....4 गटांमध्ये विभाजन केल्यानंतर ...त्या ग्रुप ला लीड करण... 7 वी आणि 8 वी चे विद्यार्थी ... एकमेकांमधील मारहाण ...टपली मारणे ....चिंमटा काढणे ...एक बोलत असताना दुसर्याने न ऐकणे ....हे सर्व प्रकार घडत होते ....माझ्या डोक्यात आधल्या दिवसाच्या रात्री पासून कसं करायचं ? काय मुलांना द्यायचा ? या गोष्टींचं मनन सुरु तर होतच त्या बरोबर ...राजकीय अजेंडा असा आहे ...या मुलांमध्ये राजकीय पाहण्याची दृष्टी निर्माण करण...हे जीवन माझं आहे ...हि शाळा माझी आहे ....यांचे बीज पेरनेे... ग्रुप बरोबर चर्चा
केल्यानंतर हे मुद्दे स्पष्ट झाले ..हे शब्द बोलत असताना ते initative घेऊन बोलणं .... नंतर शरीरामधून बाहेर काढणे ...gender मध्ये अडकून न जाता ...एक माणूस म्हणून पाहन ...याची चर्चा आणि planning सुरु झाली ....सतत चिंतन आणि मनामध्ये प्रक्रिया सुरु झाल्या होत्या ...थोडा challenging आजचा दिवस ....या कार्यशाळेची प्रस्तावना आणि आमच्या कलाकारांची ओळख मी केली ...पहिल्यांदा सुरुवात केल्याचं समाधान
...त्याच बरोबर नव -नवीन विचारांची मांडणी ..आणि प्रयोगात्मक भूमिका tor ने मला निर्माण करून दिली आहे याची जाणीव बोलता बोलता होत होती ...किती, मनाला समाधान मिळत असत ! ज्यावेळी आपण हसत खेळत संवाद साधतो आणि तो संवाद आपल्या संवादामध्ये सहभागी




असणाऱ्या साथीना समजतो...' माझी शाळा ' यावर नाटक करायला सांगितले ...आणि तो विश्वास निर्माण करण की , हो आम्ही करू शकतो ...आम्ही एकत्र करत आहोत ...हेच केवढ मोठ साध्य आहे ....हि शाळा माझी आहे ....smilyee, 4 ग्रुप ला घेऊन करत होती आणि तो आवाजाचा चढ उतार आणि एकमेकांमधील तो सुप्त संवाद .. एकमेकांच्या विचारांना फुलवत असताना दिसू लागला ...नाटकाची प्रस्तुती होत असताना कधीही न बोलणारी मुले नाटकाच्या माध्यमातून बोलू लागली ...



.आपल्या शिक्षकांसमोर आरसा बनून उभी राहिली ... हम हैं ! चा नारा त्या वातावरणात नवीन द्रुष्टी ,नवीन विचार, एकात्मतेची ताकद ,स्वतः वरचा विश्वास गुंजायमान करू लागला ...


आंतरराष्ट्रीय कलाकार अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर , राष्ट्रीय कलाकार कोमल खामकर ,तुषार म्हस्के आणि tor अभ्यासक , कलाकार स्वाती वाघ यांनी या कुरार मध्ये हा वैचारिक " स्व " च्या जाणीवेचा झेंडा रोवला ....हि दृष्टी दाखवणऱ्या रंगचिंतक - tor उत्प्रेरक मंजुल भारद्वाज यांना सलाम ....

रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Tuesday 7 February 2017

दिनांक 7 फेब्रवारी 2017.....अनुभव

आज दिवसाचा अनुभव हा चैतन्यदायी आणि धावपळ करणारा ...सकाळी योगा सेंटर ला जायचं ठरलं होतं, त्याप्रमाणे 11 वाजता दादर ला भेटलो ....आम्ही tor चे 4 रंगकर्मी ,या व्यवहारीकते च्या ओझ्याखाली दबलेल्या जीवांना जणू काही अमृत ...चैतन्य रूपाने पाजून त्यांच्यात वैचारिक अमृत चैतन्य निर्माण करत आहोत हे जाणवले ....


आज हे भाव सहज मनाला समजणारे.....अगदी सोप्या सोप्या शब्दांत आपले रूप वटवणारे ....डोळे बंद करत अनसुनी चे सूर छेडत विशाल या विश्वात स्व केंदित करणारे ....माझा आवाज या ब्रम्हांडात ऐकला जातोय आणि तो मी अनुभवतोय ....याचा प्रत्यय आणणारे ..येणारे अनुभव हे परग्रहावर आहोत की काय ? त्याचा प्रत्यय आणणारे ...हे अनुभव आल्यानंतर आता बोलायचं तरी काय ? हे विचार निर्माण करणारे...
हे शब्दात मांडून न समजणारे फक्त शारीरिक सूक्ष्म हालचालींवरून डोळ्यांना भावणारे ...आपोआप डोळ्यातून पाणी येणं ...आणि मिठी मारून मनमोकळे पणाने रडणं ....आपली स्वतः ची जाणीव करून देत आपला आरसा आणणारे ....चेहऱ्याची प्रतिमा चमकून डोळ्यातील भावना अगदी सहज प्रकट करणारे ....


अनुभवाच्या या महासागरात मी शोध तोय माझ्या असण्याने इथे कोणता वैचारिक बदल होतोय ....इथे कोणती वैचारिक क्रान्ती होतेय....आणि जगण्याचा तो आरसा दाखवत नवीन दृष्टी नवीन सृष्टी चा निर्माण करणारे ...आता , मला बाहेर नाही पहायचं आहे ....मला माझ्यात स्वतः ला शोधायचं आहे ...माझ्यातील न पाहिलेले गुण मला शोधून काढायचे आहेत ...यात फक्त निमित्त हि बाह्य परिस्थिती आहे त्याच्या तुफान ऊर्जेत झोकवणारे....हा क्षण कधीही थांबणारा नसावा हा क्षण फक्त शिकत जाणं स्वताला शोधनंआणि सतत निर्माण करणारा असावा ....असा हा नाद ...जो ...अनह्द नाद आहे....या सात्त्विक अनुभवाच्या विचारात हा योगा क्लास वरील प्रयोग जो नवीन विचार ....सत्त्व आणि शोधण्याची दृष्टी निर्माण करतो...9 ते 10 महिला सहभागी या योगा क्लास मध्ये होत्या अनसुनी चा स्वर गुंजला आणि आत्म चिंतनास सुरुवात झाली ...या आवाजात मी कधी डोळे बंद करून स्वतः चा शोध घेऊन स्व चा सूर शोधणारी....सहभागी साथीचा आलेला अनुभव हा ज्यांना डोळे नाहीत ते कसे जीवन जगतात? याची जाणीव झाली... माझा आवाज ब्रम्हांडात जात आहे ....तुम्ही यात मला ब्रम्हांड दाखवलात.... अशा पद्धतीने येणाऱ्या प्रतिक्रिया ....


आवाज तुमचा मुला सारखा आहे मध्येच असं जाणवलं कोणतरी पुरुष गाणं बोलतोय ....त्यावेळी मला हे जाणवलं म्हणून तो कलात्मक शिव आहे ....जो अर्ध नारेश्वर आहे....तो आवाज स्त्री आणि पुरुषाचा नसून तो मानवाचा आहे कलाकाराचा आहे ....

थियेटर ऑफ रेलेवंस रंगकर्मी 
तुषार म्हस्के 
९०२९३३३१४७