Friday 16 December 2016

या विश्वाच्या रनभूमिवर मी तुषार म्हस्के ...पुन्हा आगमन करत आहे.....

प्रत्येक क्षणाला स्वताच्या शोधात फिरन आता मी काय करतोय ? आता मला काय करायच आहे ….सतत चिंतनात ठेवून कलाकाराच्या भूमिकेत


आणण्यासाठी स्वतःचा शोध घेणारी स्थिति ...आणि स्थिति निर्माण करण्यासाठी केलेली साधना ...म्हणजे कला साधना …या कला साधनेचा अनुभव 26 ते 30 नोव्हेंबर २०१६ ला शांतिवन मध्ये आला…या कार्य शाळेचे उत्तप्रेरक मंजुळ भारद्वाज ….
         स्वतः हरलेल्या स्थिति वर मात करत पुढे प्रवास करण म्हणजे जीवन ...आणि त्या स्थितिवर मात करण्यासाठी स्वतः बरोबर भांडण करुण स्वतः वर विजय मिळवनं म्हणजे जीवन 6 महिन्यापासून tor टीम पासून लांब राहिल्यानंतर समझल ...मी का जगतोय ?...मी कशासाठी जगतोय ?....मी

कोणासाठी जगतोय माझ्या जगण्याचा अर्थ केवळ पैसे कमवनं आणि घर संभाळन तर अस कोणीही करू शकतो …..आणि पैसे कमवल्यानंतर मग जीवनाच्या उत्तर कालावधीत मनाची स्थिति अशी नको आहे ….मी जीवनात ठरवलेलं पूर्ण नाही करू शकलो ….आणि पुढे अस ही वाटू लागल या झोपड़ पट्टीमध्ये आता राहतोय पण, त्याच्या नंतर फ्लैट मध्ये राहणार ….मग, या मध्ये माझ अस्तित्व काय मी आहे तरी कुठे ? ...आणि या दिवसात जाणीव झाली ...दबावाच्या ओझ्या खाली सर्व जन समाज , संस्कृति ,आपले लोक काय बोलतील म्हणून मनाची स्थिति नसतानाही जाऊन नौकरी कर लग्न करून बायको घर मूल ….यांचा दबाव घेऊन मरून जा ...हे सर्व डोळ्यासमोर येऊन माझ्या छातीवर बसलेत पण, मला अस बोलायच नाही आहे मी या सर्वापासून लांब पळतोय अस अजिबात नाही .. ...या मुलाने रूम घेतली ...याचं लग्न झाल ….पण, ते जगत आहेत तस मला काहीच वाटत नाही आहे याचा विचार कोण करत नाही आहे ….g f माझ्या घरातले विचारत आहेत मुलगा किती कमावतो ? ...पण, काय करतो याला काहीच फरक नाही पड़त ...हो , तिच्या मनासाठी नोकरी ही शोधू लागलो पण, interview ला गेल्यानंतर कोणी ठेऊन घेतलच नाही …..या दिवसात जेवन हे माझ्यासाठी त्रास झाले ...घश्या खाली घास जातच नसे ...रात्री मध्येच झोपे तून उठनं ..आणि विचार करत बसन ...अस किती दिवस जगणर ...चेहरा काळ्या रंगाचा होउ लागला ...जीवन कापतोय असा भास् या दरम्यान सर्वापासून लांब राहू लागलो जणू काही अंगावर खूप साऱ्या माश्या बसल्यात आणि माझ शरीर सडत जातोय...त्रास आणि ताप या मध्ये तो वेळ तो क्षण मला दबावा खाली ठेवत आहे याची जाणीव झाली...तरीही त्यातून उठण्याची हिम्मत काही होत नाही आहे...दरम्यान माझेच मित्र येऊन आरसा बनू लागले ...काय तुमच नाटक काय म्हणत आहे…..तुषार टेंशन मध्ये आहेस का तूझ्या तला स्पार्क कमी झालाय नेगेटिव वाटत आहेस ...या गोष्टी त्रास देत होत्या दुसऱ्या बाजुला अलिप्त राहून जीवन जगुयात अस वाटू लागल ...दरम्यान देशात झालेल्या हालचाली त्यातून जाणवू लागले ….यार , तुझ्या दुख या समाजा पेक्षा या राष्ट्रा पेक्षा मोठं नाही आहे ...आणि दबावाखाली खूप जगलो आता उन्मुक्त जगुयात ...चल तुषार , समजाला तुझ्या विच्यारांची गरज आहे ...अंगावर असणार हे परंपराचंओझ  झटकून विचार केला आणि निर्णय घेतला ...पुन्हा हिम्मत करून पुढे आलो  ...आणि तो हिम्मत करून येण्याचा निर्णय माझ्या साठी आत्म प्रेरणा आणि समाधान मिळवून देणारा दिसला ….म्हणजे अस जाणवू लागले या अथांग समुद्र किनार्यावर उन्मुक्त फक्त मी एकटा आहे ...आणि हा क्षण मला प्रेरणा देणारा आहे ….या प्रकाशात पाऊल टाकल्यावर या निसर्गातील ऊर्जा मला ताकद देत आहे हा भास ...ही शक्ति ….ही ऊर्जा ...मला मिळाली आणि त्यातून अचानक माझा चेहरा चमकू लागला….तेही 6 महिन्यानंतर ….समाधान काय असत ते मला त्यावेळी समजले….बस शांत ….शांत ….आणि शांत…..
             घरातून निघत असतानाच एकदम जोश मध्ये ...विचाराने ...मनाने आणि ध्येयाने पाऊल घराबाहेर …
या विश्वाच्या रनभूमिवर मी तुषार म्हस्के ...पुन्हा आगमन करत आहे असा मनात भाव….वाह ...वाह ….
स्वतःला स्फूर्ती देत मीच आहे विश्व विजेता मी जगावर नाही माझ्या मनावर विजय मिळवलाय आणि त्याचा आनंद काय असतो ते मला समजू लागले…..माझ्या डोक्यात एक चक्री वादळ सुरु झाले जे झंझावत आहे आणि त्याचा संघर्ष मला ताकत देत आहे हे जाणवले….आणि तोच संघर्ष खूप मह्त्व पटवून देणारा असतो हे पहिल्यांदा समजू लागले… मना मध्ये स्वतः प्रेरणा बनन किती आत्म सुख देणार असत हे जाणवू लागले…..
  

अंधेरी स्टेशन म्हणजे इतिहासात लिहून राहणार असे प्रसंग त्या स्टेशन वर plat form number 7 म्हणजे दोन अनुभवी कलाकार आज विश्व चिंतनात यात्रा करत जाणार ..plat form नंबर 7 वर पोहोचलो ….मंजुल भारद्वाज मस्त पैकी समोर उभे राहून वाट पाहत असताना दिसत होते ….माझ्यासाठी हा क्षण म्हणजे अति उत्साह कारण 6 महिन्यांनंतर मी भेटणार ...पहिल तर तो माणूस आहे तसाच आपली यात्रा सृजनशील बनवत नवीन नवीन आयाम शोधत आहे हे जाणवले . पॉलिटिकल हा माणूस आता बिनधास्त सामान्य माणसा मध्ये घुसून त्यांच्या मनाला प्रश्न पाडत अशी एक बिनधास्त चर्चा राजनीति वर ट्रेन च्या आवाजावर सुरु झाली आणि तिकडूनच उत्तुंग विचारांना सुरुवात झाली …

 शांतिवन मधील प्रवेश तो रस्ता ती झाड़े तो निसर्ग आणि साथिंचे प्रश्न हे मनाला पड़त होते आणि पटत होते ? 6 महीने तुझी आठवण येत होती कुठे
होतास तुला नाही आली का आठवण ….हो, आणि माझ्या मनात सुरु राहील 6 महिन्यात असा क्षण नव्हता की जेव्हा मी कोणाला विसरलोय ….आणि माझ्या आगमनाबरोबर माझ्या आत मध्ये होणारी प्रक्रिया ही उत्सुकतेने बह रून आलेली दिसली जीवना मध्ये ठेच खाल्ल्यावर अक्कल येते ही गोष्ट खरी ...शांतिवन मध्ये फक्त तो क्षण तुषार आला ….नाइक काका धावत पुढे येऊन मीठी मारली ...शम्भरकर अगदी आनंदात होते ...भानुदास ...आणि शान्तिवन जिथे फक्त मीच दिसतो आणि बाहेर च्या जगामध्ये मी दिसत नाही याची जाणीव झाली ...मनामध्ये स्वताला शोधायला सुरुवात केल्यावर तिकडे फक्त आपणच असतो ...आणि तो आपल्या अस्तित्वाचा क्षण दिसतो ….
आज शांतिवन फुलून आलेले दिसले शांतिवन मध्ये येण्याचा आनंद हा मनाला समाधान आणि तेज निर्माण करणारा ….थोड्या वेळासाठी गहिवरून गेल्यावर पुन्हा सावरले शेवटच समाधान हे tor देतो याची जाणीव झाली ...एवढे दिवस अशी परिस्थिती होती शरीर माझ तिकडे होत पण , मन माझं तिकडे नव्हत मन या प्रक्रियेमध्ये आहे हे समजले ...आता काय याच्यातूनच नवीन मार्ग शोधून काढायचं ….म्हणजे एक गोष्ट प्रकर्शाने सतत जाणवते कि आपण ज्यांना आपल म्हणतो ते नक्की असतात ...कि, विचाराने ध्येयाने आपल्या


बरोबर वाटचाल करत असतात ते आपल्या बरोबर असतात ...विचाराने जोडल्यानंतर ते विचार सतत  मनामध्ये जिवंत राहतात  हे जाणवू लागले …चैतन्य अभ्यास करत असताना येणारे अनुभव मनामधील कचरा साफ करून पारदर्शक करत आहेत हे जाणवले ...आता मला काम करायचं आहे याची जाणीव झाली त्यामुळे कोणाचेही ओझ डोक्यावर नाही आहे हे समजलं ….हिरव्यागार त्या माळरानावर चालत जाताना गवताचा बदलत जात असणारा रंग हा मनाला मोहून काढणारा …..त्या गावता मधून आम्ही कलाकार नवीन नवीन रस्ते शोधत जात आहोत आणि निसर्ग पदोपदी
आपले रंग बदलून आम्हा कलाकारांचे स्वागत करत आहे ….राजनैतिक चिंतक हा आपल्या भूमिकेवर ठाम असतो अनेक वादळ येत असतात ...अनेक लाटा येत असतात त्या लाटांना न घाबरता योग्य वेळ बघून प्रहार करतो ….आणि तो क्षण हा निसर्गामध्ये बदलाचा काळ असतो ज्या
ठीकानांहून एक काळ दुसऱ्या काळात परावर्तीत होत असतो ….त्या बदलत्या काळाला समजनं...हे चैतन्य अभ्यास करत असताना प्रात : काळच्या वेळेत अनुभव आले …..खूप दिवसानंतर मला हा खुराक मिळत आहे ..कारण, सहा महिने एकाच ठिकाणी बसून राहिल्यानंतर आपण आता  करत आहोत ते योग्य आहे हे समजले ….


  अनहद नाद चा performance :-

 हा जीवनातील सर्वात मोठा क्षण कारण अनहद नाद मध्ये आता भूमिका बदलल्या होत्या योगिनी आता performance करत नव्हती त्यामुळे अश्विनी , कोमल सायली ,तुषार ( मी ) आणि सिद्धांत आम्ही होतो ….त्यामुळे अनहद नाद कस करता येईल ? कस होईल याची शंका येत होती ….परंतु , अनहद नाद कोणाची व्यक्ती गत मालमता नाही आहे ती कलाकाराची यात्रा आहे ...कलाकाराच्या निर्माण चा संघर्ष आहे ...आणि त्यातून निर्मिती होत असते  ….आमच्या साठी निर्माण झालेलं आव्हन आम्ही स्वीकारलं आणि सकाळी ते perform केलं ….अनहद नाद सुरु झाला त्याच बरोबर



डोक्यामध्ये विचारांचा प्रवाह सुरु झाला आता पर्यंत सुरु असलेली यात्रा डोळ्यासमोर येऊ लागली त्याच बरोबर कोणत्या विचारांमध्ये मी अडकून राहिलो आहे ...कोणत्या परिस्थिती वर मात करायची आहे हे डोळ्यासमोर येऊ लागले ….आणि त्याच शब्दांमध्ये एवढी ताकत जाणवू लागली कि , माझ्या अंतर्मनात सुरु असणाऱ्या विचारांवर मात करून पुढे येऊ लागलो …फक्त विचार डोळ्यासमोर येत राहिले आणि त्या विचारांमध्ये फक्त मी दिसू लागलो …..कधी माझी स्थिती हताश झालेली होती तर कधी त्यावर मात करून पुढे जाणारी दिसली ….नदीसारखा प्रवाहामध्ये राहून गेल्यानंतर स्वतःशी सातत्य ठेवल्यावर मनामध्ये मंथन ची प्रक्रिया सुरु झाली त्याच बरोबर डोक्यात होणारी हालचाल हि खूप भयानक वाटू लागली एका मागून एक माझी छाया डोळ्यासमोर आली त्यामध्ये या ६ महिन्यात माझी होणारी हालचाल आणि या परिस्थिती मध्ये अडकलेला मी त्यातून खूप दिवसांनी बाहेर आल्यानंतर मिळालेला समाधान … त्यामुळे हा क्षण सोडावासा वाटला नाही ….शेवटचा क्षण येता येता डोळे पाण्याने बहरून




आले ...हृदयात हुंदके जागे झाले ...आणि  कितना विरोधाभास है ...दोनो नजरो और दृष्टीकोनो में ...च्या वेळेस जाणवल वितृष्ण म्हणजे मृत्यू जो जिवंत असतानाही जाणवत होता दुसऱ्या क्षणी उत्सुकता हि तशीच जाणवत होती ...कारण ते जीवन मी जगत होतो ...आणि त्या कारणामुळे आता मला पुढची जीवनाची यात्रा मला शोधायची आहे पण , या जीवनात चाकोरी करून घालवायची नाही आहे … हे समजत होत ...मनामध्ये विचारांचा काहोर वाढू लागला त्याच बरोबर मनामध्ये सुरु असणाऱ्या प्रतिमा डोळ्यासमोर धावू लागल्या एका मागून एक ...एका मागून एक ….अरे कोणी तरी आता थांबवा अशी परिस्थिती सुरु असताना …….अपनी आवाज सुनो ...चा स्वर कानावर पडतो आणि त्यातून स्वतावर विजय प्राप्त करून पुढे गेलेला जाणवतो स्वतावर विजय प्राप्त करून आनंदाने तो क्षण मी मिळवलाय याच समाधान मला दिसला आणि त्यामध्ये आम्ही सर्व कलाकार एक मेकांना मिठी मारून उभे असताना ...अचानक डोल्यामधून पाण्याचा प्रवाह वाढला आणि ह्रदयात दाबून ठेवलेला आवाज आतोनात बाहेर पडला ...किंकाळ्या आरोळ्या ...मनातून बाहेर येत होत्या डोक्यातून सर्व कचरा निघून गेला आणि शरीर खाली कोसळला ...काहीच शुद्ध राहिली नाही काय झाल माहिती नाही पण , मी फक्त जमिनीवर पडलेला उठल्यावर जाणवल सर्व मनातील गोष्टी निघून गेल्या होत्या आता फक्त राहिलो होतो तो मी ...माहिती नाही का पण , सर्व शांत झाल होत ..मंजुळ सरांनी आवाज दिला अब उठो … काहीच न करता उठलो ...अचानक ताकत आली कुठून हे अजूनही न समजलेला कोडं आहे ...त्यानंतर ..संध्याकाळी ५ वाजता शांतिवन कॅन्टीन च्या अंगणात शो … ती अनहद नाद च्या performance मुले खुलून आली हा प्रयोग शांतिवन मधील सहकार्यांसाठी राहिला स्टेज हा सारवलेल्या जमिनीचा ….त्यातच ती गादीसारखी एकदम मऊ पायांना लागत होती ती आनंदाची एक वेगळीच मज्ज्या येत होती ….अनहद नाद ची यात्रा सुरु झाली आणि त्याठिकाणी असणार वातवरण बदलून गेलं आणि अनहद नाद चा नाद शांतिवन मध्ये घुमू लागला …..

गर्भ नाटकाचा  performance :-
 

गर्भ नाटकाची प्रस्तुती म्हणजे स्वताला आपल्या अंगावर असणाऱ्या कपड्यांतून बाहेर काढन ...आणि ती चादर म्हणजे जातीची धर्माची ...परंपरांची .. याच्यातून बाहेर पडल्यानंतर ...बाहेर फक्त आपल्याला मोकळ आकाश दिसतो ...आणि त्या मोकळे पणाची जाणीव म्हणजे ...माणूस म्हणून जगण ...आणि तो माणूस आपल्या जीवनात समाधानी जाणवतो ….आणि हा अनुभव गर्भ नाटक performance असताना मला आला ...विंगेत उभा राहिल्यावर समजले ...खूप छान





वाटतय ...म्हणजे आनंदाच्या लहरी हृदयातून बाहेर येताना जाणवू लागल्या ..खूप कमी वेळात आम्ही प्र्स्तुत्ती करण्यासाठी उभ राहिलेलो होतो ...सुरुवातीला तर कुठे जायचं आहे काय करायचं आहे हे समजतच नव्हते ….मग ...प्रेम ,वात्सल्य जस कानावर पडला तसा आपोआप मंचावर खेचला गेलो ….अगदी सहज रीत्या आनंदाने मंचावर जगत आहोत हे जाणवू लागले ….मंजुळ भारद्वाज यांच्या लिहिण्याच हे वैशिष्ट्य आहे ...शब्दांमध्ये संघर्ष करतो त्यावेळी तो आपोआप शरीरातून आपल्या चेहऱ्यावर असणारया भावानाम्ध्ये दिसू लागतो ….त्यामुळे वेगळ काही



करायची गरज नाही लागत ….आणि कोल्हापूर नंतर आता पहिल्यांदा मी गर्भ performance करत आहे ...त्यामुळे ती एक वेगळीच उर्जा माझ्या आत मध्ये होती ...आणि नाहीतर ...६ महिने स्वत : ला कोंडून ठेवल्यानंतर दबून असणारा कलाकार आता बाहेर निघाला होता ...गर्भ नाटकाने माझ्या आत मध्ये कलाकाराचा अंश निर्माण केला ...आणि त्याला आकार अनहद नाद ने दिला ...त्यामुळे हि नाटके कलाकाराला आकार देणारी नक्कीच ठरू लागली आहेत ...या performnce   नंतर खूप शांत वाटू लागले ….कारण गर्भ नाटकाच्या प्रस्तुती मध्ये असणारी ताकत मला  मिळाली ….

रंगकर्मी चा performance :-

रंगकर्मी म्हणजे कलकाराची असणारी भूमिका ...आणि त्या भूमिकेमधून स्वताला सादर करण ..म्हणजे ते मोठ आवाहन आज सर्वात मोठी जबाबदरी आम्ही tor कलाकार तसेच कार्य शाळेत सहभागी झालेले



कलाकार आज एकत्र performnce करणार वेळ सकाळी ७ वाजता  ...सूर्य उगवण्याची वेळ ...आणि तोच सूर्य कलाकार आपल्या हृदयामध्ये निर्माण करण्याची वेळ हि एकच ….नदीच्या त्या पात्राच स्टेज ...जिकडे २ वर्षा पूर्वी आवाज ऐकला होता .मैं कौन हूँ ….क्या हूँ ..इसकी मुझे अब कोई  चिंता नहीं हैं ….आज तेच शब्द माझ्या कानावर सूर्यांच्या किरणाबरोबर पुन्हा ऐकायला येऊ लागले .त्या ..सुंदर नदीच्या पात्रात ...सकाळी पडलेलं धुक ….रंगकर्मी ...रंग प्रयोग करण्यासाठी स्वताला प्रवाहात ठेवत नदिपात्रात उभे आहेत …..आणि ७ वाजता त्या पात्रात प्रेक्षक त्या नदी च्या किनाऱ्या वर उभे ...आणि लोक बोलतात सकळी ७ वाजता प्रेक्षक येत नाहीत ...इथे तर नदीच्या पात्रा भोवती performance पाहण्यासाठी उभे होते ….एक


दर्शक नेहमी कलाकाराच्या शोधात असतो ….चांगल्या कलेच्या शोधात असतो ...म्हणून , एक सूत्र त्यावेळी समजल आपण कलेच सादरीकरण करत रहायचं प्रेक्षक आपोआप त्याठीकाणी येतात ...आम्ही नंतर प्रेक्षकाना त्या अनुभूती दिल्या आम्ही प्रत्येक कलाकाराने एका एका प्रेक्षकाचा हात धरून त्यांना त्या पात्रात उभे केले …त्यांचा आलेला अनुभव हा जबरदस्त ...अनमोल होता ….त्याच ..नदीच्या पात्रात प्रवाह विरुद्ध बोटीत आम्ही कलेचे शिल्पकार उभे राहिलो नवीन इतिहास घडवणारी  बोट या महासागरात विश्व जिंकण्यासाठी निघाली आहे हे जाणवू लागले  …

या कार्यशाळेत मला जिद्द मिळाली जिंकण्याची जी विश्वात आपल नाव स्थापित करण्यासाठी अनुकूल आहे ...जी स्वताच्या संघर्षामधून जगाला दिशा देणारी आहे ….हा अनुभव मला 26-30 नोव्हेंबर 2016 ला शांतीवन मध्ये आला ….

रंगकर्मी
तुषार म्हस्के

No comments:

Post a Comment